Mira Bhayandar Morcha – त्यांना चपलेने मारायला पाहिजे होतं, राजन विचारे यांचा प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल

मीरा-भाईंदरमध्ये मराठी मोर्चात मिंधेंचे मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले. पण मोर्चातील आक्रमक आंदोलकांनी त्यांना 50 खोके एकदम ओक्के, प्रतापसरनाईक गो बॅक… अशा घोषणा देत त्यांना हुसकावून लावले. सरनाईक यांच्यावर पाण्याची बाटलीही भिरकावण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे सरनाईक यांच्या हल्लाबोल केला. प्रताप सरनाईकना चपलेने मारायला पाहिजे होते, असे राजन विचारे म्हणाले.
प्रताप सरनाईकना चपलेने मारायला पाहिजे होतं. कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहात. लाज वाटायला पाहिजे. पोलिसांना सांगता, तुम्ही मोर्चा रद्द करा. पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. आणि इकडे येऊन तुम्ही मोर्चाला समोरं जातात? चपलेनी मारलं पाहिजे. आणि त्यांनी पहिले राजीनामा द्यावा. सत्तेत बसलेत ना तिकडे 50 खोके घेऊन त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे? या ठिकाणी यायची गरज काय तुम्हाला? तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता. तिथे आमच्यावर खोट्या केसेस दाखल करता आणि इथे येऊन फक्त चमकोगिरी करायला आले होते, अशी खरमरीत टीका राजन विचारे यांनी केली. पोलिसांना दोष देण्याचा काही उपयोग नाही, असे राजन विचारे पुढे म्हणाले.
एकजूट काय असते हे चार दिवसांपूर्वी संपूर्ण देशाने बघितलं. हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यात आला. सरकारला नमावं लागलं. आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल. इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही. आज काहींना तडीपारच्या नोटीस दिल्या होत्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात कोणाची दादागिरी चालू देणार नाही. आणि जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला त्याच प्रकारे तोंड देऊ. जाणूनबुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम सुरू आहे. एक महाशय इकडे येऊन गेले. तुम्हाला लाज वाटत असेल तर पहिले राजीनामा द्या, मग इकडे या, असे राजन विचारे यांनी मोर्चाला संबोधित करताना मिंधेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांना सुनावले.
Comments are closed.