आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधी
मीरा भाईंदर हॉस्पिटल बातम्या: मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार समोर (Mira Bhayander Hospital News) आला आहे. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माटेकर (Suhasini Matekar) यांच्या हाताला उंदराने कुरतडल्याची भीषण घटना समोर आली होती. दुर्दैवाने उपचारादरम्यान काल संध्याकाळी सुहासिनी माटेकर यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. (Mira Bhayander Hospital News)
नेमकं काय घडलं? (Mira Bhayander Hospital News)
89 वर्षीय सुहासिनी माटेकर यांना 12 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुहासिनी माटेकर यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात (ICU) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी जेव्हा रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात आले आणि त्यांनी महिलेच्या हातांवर जखमांच्या खुणा पाहिल्या. ज्या उंदरांनी चावल्यामुळे झाल्यासारख्या वाटत होत्या. यानंतर सीसीटीव्ही जेव्हा पाहिले, तेव्हा उंदराने सुहासिनी माटेकरांचा हात कुरतडल्याचे समोर आले.
रुग्णालयाचे अधिष्ठाता काय म्हणाले? (मीरा भाईंदर हॉस्पिटल न्यूज)
सुहासिनी माटेकर यांच्या कुटुंबाचा असा आरोप आहे की, कर्तव्यावर असलेले डॉक्टर आणि परिचारिका (नर्सिंग स्टाफ) यांना नातेवाईकांच्या लक्षात येईपर्यंत या परिस्थितीची काहीच कल्पना नव्हती. स्थानिक नागरिकांनी या सरकारी रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean), डॉ. जफर तडवी यांना या घटनेबाबत विचारले असता, रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकाम कामामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. रुग्णालयाच्या आजूबाजूला केलेल्या खोदकामांमुळे देखील उंदरांची संख्या वाढल्याची प्रतिक्रिया डॉ. जफर तडवी यांनी दिली.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:
आणखी वाचा
Comments are closed.