मीरा-भाईंदरमध्ये शिंदे गटाला धक्का, शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

शिंदे गटाला जोरदार धक्का बसला. ओडिसा समाजातील शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करून धगधगती मशाल हाती घेतली. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी जिवाचे रान करू, असा निर्धार या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भाटईंदरमध्ये शिवसेनेची जोरदार घोडदौड सुरू आहे. शिवसेना उपजिल्हा संघटक प्राची पाटील आणि शाखाप्रमुख दशरथ गावकर यांच्या प्रत्नाने शिंदे गटाचे ओडिसा समाजाचे राउलो डी. कुमार यांच्यासह आईल सेनापती, सौमेंदर साहू, राजेश ढोलो, रतिकांत बाबू, सुबुधी बाबू, उपेंद्र बाबू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राज्य पक्ष संघटक उद्धव कदम, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या सर्वांचे भगवा झेंडा हाती देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.