बुलढाणा जिह्यात महापुरुषाच्या पुतळ्य़ाची विटंबना, नागरिकांना शांततेचे आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जिह्यातील जळगाव जामोद शहरात 14 फेब्रुवारीच्या रात्री साडेअकराच्या सुमारास डॉ. बाबासाहेब  आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची एका माथेफिरू तरुणाने विटंबना केल्याच्या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या जळगाव जामोद शहरात तणावपूर्ण शांतता असून, शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन आरोपीस चार तासांच्या आतच पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे व सहकाऱ्यांनी घरून अटक केली असून, आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Comments are closed.