शाळेच्या टेरेसवर मंडप टाकून दहावीचे पेपर, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बीडच्या कुर्ला येथील यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये दहावीची परीक्षा सुरू आहे. मात्र आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था शाळेने केली. त्यामुळे बोजवारा उडाल्याचं यातून दिसून येतंय.

बीड शहराजवळील अगदी पंधरा किमी अंतरावर असलेल्या कुर्ला येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात विचित्र प्रकार आज दहावीच्या परीक्षेतील पहिल्याच दिवशी पाहण्यास मिळाला, या विद्यालयात परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नव्हती कडक उन्ह असताना ना छत ना बाकडे थेट मंडप उभारून मंडपात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली, कोणती ही सुविधा विद्यार्थ्यासाठी उपलब्ध नव्हती.पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा आणि त्या शाळेचा गलथान कारभार उघड झाला. सध्या वातावरण बदललेले आहे, अचानक वादळ वारे अन् पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परीक्षा सुरू असताना वादळ वारे सुटले तर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची असा सवाल उपस्थित होत आहे. या परीक्षा केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची तपासणी कोणी केली. सेंटर साठी परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकाराने पालकांसह जिल्हाभरात शिक्षण विभागाचे हसू झाले आहे.

या परीक्षा केंद्रावर आज इंग्रजी पेपर साठी 85 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मंडप देऊन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाची मोठी धावपळ झाली, उद्यापासून जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मध्ये परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थी संख्या वाढल्याने मंडप टाकला

अनेक वर्षांपासून शाळेच्या वरंड्यात बसून विद्यार्थी पेपर द्यायचे. मात्र यावर्षी विद्यार्थी संख्या वाढली आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचं केंद्रप्रमुख अभिषेक राऊत यांनी मान्य केलं. उद्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केल्याचे म्हणत या प्रकारावर शाळा प्रशासनाने सावरा सावर केली.

Comments are closed.