बेपत्ता महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला; अपघात की घातपात? नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे एका महिलेचा काल रात्री उशिरा मृतदेह आढळून आला. राहत्या घरापासून बेपत्ता झालेल्या एका 56 वर्षीय महिलेचा काल रात्री मृतदेह (Crime News) हिरावाडीतील भोरे नाट्यगृहाजवळ जागेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. भारती माणिक वल्टे असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या शुक्रवारी त्या हिरावाडीतून बेपत्ता झालेल्या होत्या. याबाबत पंचवटी पोलिसात मिसिंगची केस दाखल करण्यात आली होती.
काल(19 जानेवारी) रात्री उशिरा भोरे नाट्यगृह जवळ मोकळ्या जागेत भारती वल्टे या मयत अवस्थेत आढळून आल्या. वल्टे यांच्या गळ्याभोवती साडीने गुंडाळले होते. शवविच्छेदन केल्या नंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र हा अपघात आहे कि घातपात अशी शंका आता या निमित्याने उपस्थित केली जात आहे.
महिला डॉक्टरला भरधाव कारने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण बदलापूर मार्गावर चिखलोली परिसरात एक अपघात झाला आहे. डॉक्टर रेश्मा सिद्धार्थ वर्मा या दुपारी पावणे चारच्या सुमारास घरी जात असताना कल्याण बदलापूर महामार्गावर बदलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या ऍक्टिव्हाला धडक दिली. यामध्ये डॉक्टर वर्मा गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांच्या हाताला, पायाला, गुडघ्यांना, मांडीला आणि पाठीवरही गंभीर दुखापत झाली आहे. तर त्यांच्या दुचाकीचंही मोठं नुकसान झालंय. या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
धुळे तहसील कार्यालयाची एकाने केली तोडफोड, नेमकं कारण काय?
धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव हे काम करत असताना त्याठिकाणी आलेल्या विक्की परदेशी आणि अन्य 3 ते 4 जणांनी सुरेश पाईकराव यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर कामकाज बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच झालेल्या या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे… यावेळी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.