AUS vs ENG: मिचेल स्टार्कने मोडला 22 वर्षांचा जुना रेकॉर्ड! माजी पाकिस्तानी गोलंदाजाला मागे टाकत रचला इतिहास

ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्क (Mitchell Starc) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या डावात त्याने आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत आणि याचबरोबर त्याने इतिहास रचला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला आहे.

2008 मध्ये वसीम अक्रम (Wasim Akram) निवृत्त झाले होते आणि तेव्हापासून त्यांच्या नावावर हा जागतिक विक्रम होता. आता 22 वर्षांनंतर मिचेल स्टार्कने त्यांना मागे टाकले आहे. स्टार्कने बेन डकेट (Ben Duckket) आणि ओली पॉपला (Ollie pope) शून्यावर बाद केले, तसेच 31 धावांवर खेळणाऱ्या हॅरी ब्रूकलाही (Harry Brook) बाद केले. त्याने आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत आणि 415 विकेट्स घेऊन तो कसोटी इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला आहे.

वसीम अक्रमच्या नावावर 414 विकेट्स होत्या. मिचेल जॉनसन, जहीर खान आणि ट्रेंट बोल्टसारखे मोठे गोलंदाज हा विक्रम मोडू शकले नाहीत, पण स्टार्कने हे साध्य केले आहे. ऍशेस 2025-26 (Ashes 2025- 26) मध्ये त्याने दोन सामन्यांच्या तीन डावांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याची सरासरी 11.46 आहे. त्याने एक ‘फाइव्ह विकेट हॉल’ (एका डावात 5 विकेट्स) देखील घेतला आहे. जर तो या मालिकेत 35-40 विकेट्स घेऊ शकला, तर तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.

Comments are closed.