मिचेल स्टार्कचा इतिहास; 450 कसोटी बळी घेणारा ठरला जगातील पहिला डाव्या हाताचा गोलंदाज

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गकेबरहा येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने नवा इतिहास रचला आहे. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी घेणारा जगातील पहिला डाव्या हाताचा गोलंदाज ठरला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मिशेल स्टार्कने मॅथ्यू ब्रिट्झकेला ४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून आपले खाते उघडले. त्यानंतर मंगळवारी त्याने वियान मुल्डरला तंबूत पाठवून कसोटी क्रिकेटमध्ये आपले ४५० बळी पूर्ण केले. तो कसोटीत चेंडूंच्या संख्येनुसार सर्वात जलद ४५० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

च्यावेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळींचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा आणि नॅथन लियॉन यांनी हा विक्रम केला आहे. स्टार्कने सर्वात कमी म्हणजे २०,५७७ चेंडू फेकून जगात सर्वात जलद ४५० बळी घेण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत त्याने आपल्याच देशातील दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला आहे, ज्याने ४५० बळींपर्यंत पोहोचण्यासाठी २३,४७४ चेंडू टाकले होते. मिशेल स्टार्कने ४५० कसोटी बळींची ही कामगिरी १०९ सामन्यांत साध्य केली.

च्यामिशेल स्टार्क सामन्यांच्या संख्येनुसार ४५० कसोटी बळी घेणारा दुसरा सर्वात जलद ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत पहिल्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्राचे नाव आहे, ज्याने १०० सामन्यांत ४५० कसोटी बळी पूर्ण केले होते. त्यानंतर स्टार्कचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते, ज्याने १०९ सामन्यांत ४५० बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांत ४५० बळी घेण्याचा जागतिक विक्रम श्रीलंकेचे दिग्गज स्पिनर मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील ८० व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती.

च्यामिशेल स्टार्कने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १९ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी, २१ वेळा ४ बळी आणि ४ वेळा संपूर्ण सामन्यात १० बळी घेण्याची किमया केली आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी ५८ धावा देऊन ७ बळी घेण्याची राहिली आहे, जी त्याने गेल्या वर्षी ॲशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध केली होती. चेंडूसोबतच स्टार्कने बॅटनेही मोलाचे योगदान दिले आहे. त्याने २०.०३ च्या सरासरीने २५०४ धावा केल्या आहेत. ३६ वर्षांच्या या खेळाडूने या प्रकारात १३ अर्धशतके ठोकली आहेत.

Comments are closed.