मिठी नदीत आढळला पुरुषाचा मृतदेह
मिठी नदीत आज पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
आज सकाळी स्थानिकांना मिठी नदीत मृतदेह तरंगत असताना दिसला. याची माहिती स्थानिकांनी बीकेसी पोलिसांना दिली. काही वेळातच बीकेसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने मिठी नदीतून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. त्या व्यक्तीचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांपूर्वीच झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. आत्महत्या आहे की अपघाताती मृत्यू हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृत व्यक्तीचे फोटो शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर प्रसारित केले आहे.
Comments are closed.