IND vs ENG: इंग्लंडचे खेळाडू मोहम्मद सिराजला कोणत्या नावाने हाक मारतात? स्टुअर्ट ब्रॉडने केला मोठा खुलासा

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तुफान कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. भारतात सिराजला अनेक टोपणनावांनी ओळखलं जातं. ‘मियां भाई’ आणि ‘डीएसपी सिराज’. पण इंग्लंड क्रिकेट संघ त्याला एका वेगळ्याच नावाने हाक मारतो. याचा खुलासा इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) केला आहे.

इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने सिराजच्या टोपणनावाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की इंग्लंडची टीम, विशेषतः बेन डकेट मोहम्मद सिराजला ‘मिस्टर अँग्री’ म्हणतो. कारण सिराज मैदानावर आपल्या जोशपूर्ण अंदाजासाठी ओळखला जातो. तो विकेट घेताच समोरच्या संघावर आक्रमकपणे सणसणीत उत्सव साजरा करतो. यामुळेच इंग्लंडचे खेळाडू त्यांना ‘मिस्टर अँग्री’ या नावाने ओळखतात.

सिराजने या मालिकेत भारतासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. 9 डावांमध्ये त्याने एकूण 18 विकेट्स घेतलेल्या आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या डावात त्याने 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, ओव्हलमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टच्या पहिल्या डावातही त्याने 4 विकेट्स मिळवल्या.

विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेतील सर्वच सामन्यांमध्ये सिराजने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या वर्कलोडवर सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतः सिराजने म्हटलं होतं की, ‘मी देशासाठी एकही सामना मिस करू इच्छित नाही.’

Comments are closed.