मिझोरामचा लालियांजुआला छांगते हिंदुस्थानचा सर्वोत्तम फुटबॉलवर
मिझोरामचा स्टार फुटबॉलपटू लालियांजुआला छांगतेने पुन्हा एकदा हिंदुस्थानी फुटबॉलवर आपला ठसा उमटवला आहे. 29 वर्षीय छांगतेला ‘इंडियन फुटबॉलर ऑफ द इयर 2026’ या प्रतिष्ठsच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदुस्थानी फुटबॉलच्या दिग्गज बायचुंग भुतियांच्या हस्ते त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. फुटबॉल प्लेयर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार विशेष आहे. कारण सहकारी खेळाडूंच्या मतदानातून विजेत्याची निवड केली जाते. म्हणजेच मैदानातील प्रतिस्पर्ध्यांनीच छांग्तेच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे. छांग्तेने यापूर्वी 2023-24 हंगामातही हा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे दोन वेळा हिंदुस्थानचा सर्वोत्तम फुटबॉलपटू होण्याचा मान त्याने मिळवला आहे. दरम्यान, मुंबई फुटबॉल क्लबमधून नुकताच मोहन बागानमध्ये दाखल झालेल्या छांग्तेच्या कारकीर्दीला या पुरस्कारामुळे आणखी झळाळी मिळाली आहे.
Comments are closed.