तुळजा भवानी मंदिरात VIP पासच्या माध्यमातून भाविकांची लूट, पास बंद करा; कैलास पाटील यांची मागणी

तुळजापूरमध्ये तुळजा भवानी मंदिरात व्हीआयपी पासच्या माध्यमातून भाविकांची लूट होत आहे. देवासमोर सगळे सामान आहेत. त्यामुळे व्हीआयपी पास बंद केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

कैलास पाटील म्हणाले की, “तुळजा भवानी मंदिरात ट्रस्टने काही व्हीआयपी पास राखीव ठेवले आहेत. या राखीव पासचा बाजार मांडला जातोय. येथे कोणाला पास दिला जातो, याची पक्की नोंद होत नाही, पेन्सिलने लिहिलं जातं. तोच पास परत फिरवून इतरांना दिला जातो. आमची आणि पुजारी मंडळाची मागणी आहे की, व्हीआयपी पाससाठी 200 रुपये फी ठेवली असेल, तर सगळ्यांना समान न्याय असावा. कोणालाही मोफत पास दिला जाऊ नये. तसेच तुम्ही कोणाला पास देताय याची पक्की यादी त्यांच्या संकेतस्थळावर पाहिजे. पेन्सिलने लिहिल्याने पुन्हा तो पास फिरवला जातो, ज्यामुळे भाविकांची लूट होत आहे. अशाच काही चुकीच्या लोकांमुळे देवस्थान बदनाम होत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणी पुजारी मंडळ आणि स्थानिक नागरिकाची आहे.”

Comments are closed.