कर्जमाफीची मर्यादा दोन लाखावरून पाच लाखापर्यंत करावी, आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची मर्यादा आता दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली आहे. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी सरकारला धारेवर धरत कृषी आणि ऊर्जा विभागातील घटलेल्या तरतुदींबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
विधानसभेत बोलताना कैलास पाटील म्हणाले आहेत की, कर्जमाफीची मर्यादा दोन लाखावरून पाच लाखापर्यंत करावी. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजारवरून एक लाख परतफेड करायला हवी. कृषी क्षेत्रासाठीची तरतूद वाढवायची सोडून ५.२ टक्क्यांवर आणली, असे असताना आपली अर्थव्यवस्था ५०० अब्ज डॉलरपर्यंत जाणार कशी? ऊर्जा विभागात ३३ टक्क्यांनी तरतूद कमी केली आहे. ते का? आपल्या ऊर्जा विभागातील सर्व गरजा पूर्ण झाल्या आहेत का? असा सवाल ही विचारला आहे.
Comments are closed.