MLA Rohit pawar social media post expensive car owner will be soon revealed urk


मुंबई – मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला रांगेत उभे राहावे लागते. ओळखपत्र तपासणीपासून अनेक तपासण्यांना सामोरे जावे लागते. मात्र बुधवारी एक आलिशान लम्बोर्गीनी कार वेगाने आली. कोणतीच तपासणी नाही, आत कोण बसलं याची नोंद नाही. कोणाला भेटायला आले याची माहिती घेतली गेली नाही. बड्या लोकांसाठी पायघड्या आणि सामान्य जनतेची ठिकठिकाणी अडवणूक होत असल्याची चर्चा होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी काळ्या रंगाच्या महागडी गाडी कोणाची असा सवाल करत काळ्या गाडीच्या महागड्या मालकाच्या काळ्या कारनामांचा लवकरच खुलासा करु, असे म्हणत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

काळ्या गाड्याच्या महागड्या मालकाचा लवकरच खुलासा… 

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन काळ्या गाडीबद्दल मंत्रालयात चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. आलिशान काळ्या गाडीतून आलेली व्यक्ती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना भेटण्यासाठी आल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. या कारची कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. काळ्या रंगाच्या या महागड्या कारच्या काचाही काळ्या होत्या. त्यामुळे आतमध्ये कोण होते याची चर्चा सुरु झाली आहे.

– Advertisement –

आमदार रोहित पवारांनी या महागड्या काळ्या गाडीबद्दल सोशल मीडियावर म्हटले आहे की, “काल मंत्रालयात काळ्या रंगाची एक महागडी गाडी आली, ही महागडी गाडी कुणाची? कुणाला भेटायला आले? कोणत्या कामासाठी भेटायला आले? अशा बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. एरवी सर्वसामान्यांची नाकाबंदी करणारी मंत्रालयीन यंत्रणा या महागड्या गाडीची कुठलीही चौकशी न करता आत सोडते, म्हणजे गाडी मालक देखील महागड्या गाडी प्रमाणे नक्कीच महागडा असेल.” अशी टीका त्यांनी केली. रोहित पवारांनी , या महागड्या काळ्या गाडीच्या महागड्या मालकाच्या काळ्या कारनामांचा लवकरच खुलासा करू! असा इशाराही दिला आहे.

– Advertisement –

महागड्या कारमधून मंत्री विखे पाटील यांच्या भेटीसाठी आले? 

आलिशान लॅम्बोर्गिनी कारमधून आलेली व्यक्ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी आली होती का? अशी चर्चा मंत्रालयात सुरु आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच कोणीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे कार कुणाची, कोण आले होते, याबाबत तर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा : Beed Murder : गुंडाबद्दल बोलण्यात कोणता जातियवाद? मनोज जरांगे धनंजय मुंडेंवर संतप्त; म्हणाले, तुमची लय लफडी…





Source link

Comments are closed.