MLA Sanjay Gaikwad from Shindes Shiv Sena tried to unite Uddhav Thackeray Eknath Shinde


बुलढाणा – शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला सुरुवात केली. मात्र स्वपक्षीयांसह सहकारी भाजप नेत्यांनी कान टोचल्यानंतर आणि ठाकरे गटाने टोलवल्यानंतर त्यांनी या पुढाकारातून माघार घेतली. आता पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेचे आणखी एक आमदार दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, राजकारणामध्ये कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो. कालचा शत्रू उद्याचा मित्र आणि कालचा मित्र उद्याचा शत्रू, हे सगळं समीकरण असते. कधी आज आम्हाला कोणाच्या विरोधात बोलावे लागेल. उद्या ते सोबत आले तर त्यांचं गुणगान गावे लागते, हे राजकारण आहे” असं संजय गायकवाड म्हणाले.

शिवसेना एकत्रिकरणावर काय म्हणाले संजय गायकवाड?

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले होते की, “मला संधी मिळाली, तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन.” यावर आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “जर सकारात्मक पाऊल दोन्हीकडून पडत असेल तर हा विचार चुकीचा आहे असं वाटत नाही. शेवटी हिंदुत्ववादी विचाराचे लोक एकत्र काम करत असतील तर चांगला विचार आहे.” असं गायकवाड म्हणाले.

शिवसेनेते गटबाजी नाही

शिवसेना शिंदे गटातील काही आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर संजय गायकवाड म्हणाले, “आमच्या शिवसेनेत कुठलेही गट नाहीत. आमचा नेता खंबीर आहे. सगळे आमदार आम्ही एका जीवाचे आहोत. आमच्याकडे कुठलीही गटबाजी होणार नाही.” असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा : Sanjay Raut : राऊतांचा खळबळजनक दावा; वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली



Source link

Comments are closed.