Mla sharad sonawne jion Shiv sena Shinde faction at pune


पुणे – विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. तब्बल 237 आमदारांच्या पाठिंब्याने महायुती सरकार स्थापन झाले. शिवसेना शिंदे गटाचे 60 आमदार निवडून आले. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले. यात शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठे खिंडार पाडले. मात्र एकही विद्यमान आमदार आतापर्यंत शिंदे गटात सामिल झाला नाही. मात्र आज एका विद्यमान आमदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे शिंदे सेना आता पुण्यात मजबूत स्थितीत आली आहे.

आमदार शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. बाबू पाटे शिवसेना उबाठाचे नेते म्हणून जुन्नर तालुक्यात काम करत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार शरद सोनवणे, देवराम लांडे आणि बाबू पाटे यांनी प्रवेश केला. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली.

शरद सोनवणे यांच्यावर शिरुरची जबाबदारी

शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे माजी खासदार या भागातील मोठे नेते आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. शिवाजीराव आढळराव यांनी शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडली होती. त्यामुळे ही जागा भरुन काढण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्याकडे देण्यात आली.

हेही वाचा : Datta Gade : गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याचा कोर्टात आरोपीच्या बचावासाठी वापर, वकील म्हणाले…



Source link

Comments are closed.