MLC 2026 Final: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नाइट रायडर्स विजयी, उद्ध्वस्त केले 'हे' तीन रेकॉर्ड
रविवारी (19 जुलै) मेजर लीग क्रिकेट (MLC) 2026 हंगामाचा अंतिम सामना खेळला गेला. ओकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात लॉस एंजेलिस नाइट रायडर्सने (LAKR) वॉशिंग्टन फ्रीडमचा अवघ्या चेंडूवर पराभव केला आणि हा सामना 1 धावेने जिंकला. त्याचबरोबर जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्यांदाच MLC चा चषक उंचावला. या विजयादरम्यान लॉस एंजेलिसने तीन मोठे विक्रम मोडले आहेत.
वॉशिंग्टनचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय
वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लॉस एंजेलिसने प्रथम फलंदाजी करत कोलिन मुन्रोच्या 40 धावा, आंद्रे फ्लेचरच्या 47 धावा आणि मॅथ्यू ट्रॉम्पच्या 39 धावांच्या जोरावर 19.4 षटकांत सर्व 10 विकेट्स गमावत 164 धावसंख्या उभारली.
वॉशिंग्टनकडून बेन ड्वारशुइसने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच मायकल ओव्हेन, निखिल चौधरी आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
165 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरेनसमोर वॉशिंग्टनची सुरूवात अडखळत झाली. त्यांनी 4.5 षटकांत 29 धावांवरच तीन विकेट्स गमावल्या. या तिन्ही विकेट्स नरेनने घेतल्या. त्यानंतर अँड्रिस गॉस आणि निखिलने वॉशिंग्टनचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली, मात्र निखिल 25 धावांवर असताना होल्डरचा शिकार बनला. गॉसही 40 धावा करत परतला.
त्यानंतर ओबस पिएनारने चौकार-षटकार मारत संघाला विजयाच्या जवळ नेले, मात्र शॅडली व्हॅन शाल्कविकचे शेवटचे षटक लक्षवेधी ठरले.
शाल्कविकने 19 व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर पिएनारला 53 धावांवर बाद केले. त्याआधी त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले होते. तिसऱ्या चेंडूवरही विकेट गेल्याने सामना अधिक अटीतटीचा झाला.
चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर एकेरी धाव झाल्याने वॉशिंग्टनला विजयासाठी एक चेंडूत तीन धावा पाहिजे होत्या. शेवटच्या चेंडूवरही विकेट गेल्याने लॉस एंजेलिस विजेता बनला.
लॉस एंजेलिसचे रेकॉर्ड्स
हा सामना लॉस एंजेलिसने एका धावेने जिंकल्याने त्यांनी MLC मध्ये एक विक्रम रचला आहे. MLC मध्ये धावांच्या फरकाने सर्वात कमी फरकाने विजय मिळवण्याचा विक्रम आता लॉस एंजेलिसच्या नावावर नोंदवला गेला आहे.
लॉस एंजेलिससाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता होल्डरच्या नावावर. ही कामगिरी करताना त्याने रोव्हमन पॉवेलला मागे टाकले. तसेच शेवटच्या षटकात भन्नाट कामगिरी करणाऱ्या शाल्कविकने आंद्रे रसेलला मागे टाकले. शाल्कविक आता लॉस एंजेलिससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा (31) गोलंदाज बनला आहे. (MLC 2026 Final Los Angeles Night Riders the final ball won vs Washington Freedom)
स्टार सुनील नारायण
नरेनने या अंतिम सामन्यात 4 षटकांत 13 धावा देत 3 विकेट्स घेण्याची जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे तो सामनीवीर ठरला. तसेच त्याने मालिकावीराचाही पुरस्कार पटकावला.
Comments are closed.