काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लाजेकरांवर मनस
अमेय खोपकर दिग्पाल लांजेकर वर: नव्या वर्षात अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2 जानेवारीला चित्रपटगृहात दाखल झालेला क्रांतीज्योती विद्यालय चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालतोय. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी यंदाचा वर्ष दमदार असल्याचे बोललं जात आहे. दुसरीकडे महिन्याच्या शेवटी दोन बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आणि बहुचर्चित ‘ रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या दोन चित्रपटांची एकाच दिवशी टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लाजेकरांवर (Digpal Lanjekar) तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
‘ फक्त महाराजांचा चित्रपट आहे म्हणून मी गप्प बसलोय. दिवसाला तीन-चार चित्रपट येतात आणि आपण मराठी निर्माते गप्प बसतो. काही निर्माते खरंच शेफरले आहेत. त्यांचे मस्ती उतरवायला हवी. त्यांना बॅन करण्याची गरज आहे, असं म्हणत निर्माते व मनसे नेते अमेय खोपकर चांगलेच संत आपल्याच पाहायला मिळालं. नेमकं घडलं काय? जाणून घेऊया.मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे ‘ पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Amey Khopkar:नेमकं काय म्हणाले अमेय खोपकर?
पुन्हा एकदा साडे माडे तीन हा अंकुश चौधरी दिग्दर्शित चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशनच्या एका कार्यक्रमात प्रदर्शनाच्या तारखेवरून मनसे नेते अमेय खोपकर दिग्दर्शक दिग्पाल लाजेकरांवर चांगलेच संतापलचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, ” एक गोष्ट सांगावीशी वाटते. इतर निर्माते गप्प बसतात पण मी गप्प बसणार नाही. या गोष्टीचा मी निषेध करतो. विषयाचा आहे की, ‘ पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची तारीख इतर चित्रपटांसाठी तीन वेळा बदलली आहे. दुसऱ्या सिनेमाला तारीख मिळू दे चित्रपटगृह मिळतील तो सिनेमा चालेल. त्याही सिने मला दोन चार आठवडे मिळू दे म्हणून मी असा निर्णय घेतला होता. आता तीन-चार दिवसांपूर्वी दिपाल लांजकरांचा ऐतिहासिक सिनेमा जो 16 फेब्रुवारीला येणार होता, त्याचं तसं पोस्टर लॉन्च झालं होतं. आता अचानक त्यांनी 30 जानेवारी ची घोषणा केली. कुणाला विचारलं नाही.. सांगितलं नाही, थेट घोषणा केली.
ना कॉल केला ना उचलला..
दुसऱ्या दिवशी मी दिग्पाल लाजेकरांना फोन लावला. त्यांना म्हटलं माझ्या चित्रपटाची आधी जी जाहीर केली तीच तारीख आहे. तुम्ही असे करू नका. हे चुकीचे आहे. त्यावर त्याने म्हटलं,”ओह तुमची आहे का फिल्म?” मला कळलंच नाही तुमची आहे का फिल्म म्हणजे काय? त्यानंतर त्यांनी सांगितलं हे डिस्ट्रीब्यूटरचं म्हणणं आहे. मी सांगितलं डिस्ट्रीब्यूटरचा याच्याशी काहीही संबंध नसतो. चित्रपटाची तारीख ही निर्मात्याच्या हातात असते. मी म्हटलं, तुम्ही तारीख बदला तुमचा सिनेमा मोठा आहे. तुमचाही सिनेमा चालला पाहिजे. मी आधी तारीख जाहीर केली आहे आता तुम्ही असं करू नका. एवढं बोलून मला कळवायला सांगितलं. नंतर याविषयी काय निर्णय आहे तो घेऊन तुम्हाला कळवला जाईल असं सांगण्यात आलं. मात्र अजूनपर्यंत दिग्पालने कॉल केलेला नाही. उचललाही नाही.’ असे अमेय खोपकर म्हणाले.
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी….
‘ मी विषय सोडून दिलाय पण मी या गोष्टीचा निषेध करतो. फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर चित्रपट आहे म्हणून मी गप्प बसलोय. दिवसाला तीन-चार चित्रपट येतात आणि आपण मराठी निर्माते गप्प राहतो. काहीही बोलत नाही. काही निर्माते खरंच शेफारले आहेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी. त्यांना बॅन करण्याची गरज आहे.’
‘ दिग्पाल लांजेकरने असाच आगाऊपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला दिग्पाल लांजेकरला बॅन करा असं सांगेन. आमच्या चित्रपटासाठी ज्या दीडशे दोनशे लोकांनी मेहनत घेतली ती काय फुकट जाऊ देऊ का? मी या गोष्टीचा निषेध करतो. त्यांना देखील चित्रपटगृह मिळू दे. आम्हालाही मिळू देत’ असे अमेय खोपकर म्हणाले.
चित्रपटाविषयी बोलताना मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले, “अप्रतिम सिनेमा झाला आहे. तुम्ही खरच खूप हसाल. सगळ्या कलाकारांनी अप्रतिम काम केली आहेत. 30 जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा टीव्हीवर घेण्याची वाट बघू नका.”
आणखी वाचा
Comments are closed.