पंढरपूर नगरपालिकेत मनसेला यश, राज ठाकरे यांची दिलीप धोत्रे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

नुकत्याच जाहीर झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला (मनसे) यश मिळाले आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक १७ मधून विक्रमी मतांनी विजय मिळवला. या यशानंतर दिलीप धोत्रे यांनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी धोत्रे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत भरभरून अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
निवडणुकीबाबत चर्चा करताना राज ठाकरे यांनी लवकरच पंढरपूरला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले. पंढरपुरात मनसेने मिळवलेल्या यशाबाबत राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून दिलीप धोत्रे यांचे कौतुक होत आहे.

Comments are closed.