5999 रुपयांना मोबाइल लॉन्च; 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि बरेच काही…

Ai+ Pulse 2 : तुमचे बजेट कमी असेल आणि तरीही स्वस्तात मस्त Android मोबाइल घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्रसिद्ध ब्रँड Ai+ ने भारतीय ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत एक नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Ai+ Pulse 2 आहे आणि त्याची किंमत फक्त 5999 रुपये ठेवण्यात आली आहे. आजकाल मोबाईलच्या किमती गगनाला भिडल्या असताना सामान्य माणसाला हा मोबाईल खरेदी करणे नक्कीच परवडेल.

Ai+ Pulse 2 हा 4G स्मार्टफोन आहे. मोबाईलच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.74-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा मोबाईल Unisoc T7250 octa-core प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि Android 16 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर Ai+ Pulse 2 मध्ये 50-मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन IP64 रेटिंगसह येतो. म्हणजेच, ते धूळ आणि पाण्यापासून संरक्षित आहे. पॉवरसाठी, मोबाईलमध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हा स्मार्टफोन एकूण 2 स्टोरेजमध्ये येतो. एक 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आणि दुसरा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 रुपये आहे तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 11 मार्च रोजी फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन हिरवा, निळा, गुलाबी, जांभळा आणि काळ्या रंगात खरेदी करता येईल.

Comments are closed.