टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला; दापोली कळंबट येथे नेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने मोबाईलधारक हैराण
कळंबट गावात बीएसएनएल कंपनीने मोबाईल टॉवर उभा केला असला तरी ‘टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला…’ अशी काहीशी अवस्था कळंबट गावासह परिसरातील गावांमधील मोबाईलधारकांची झाली आहे. सद्यस्थितीत मोबाईल फोनचा वापर खूपच वाढला आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागात म्हणावे तशी नेटकनेक्टीव्हिटीची सुविधा मिळत नसल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.
नेटकनेक्टीव्हिटी अभावी बँका, पोस्ट, पतसंस्था सारख्या वित्तसंस्था तसेच सरकार मान्य रास्त दराच्या दुकानातील धान्याची उचल असेल जमिनीचा सात बारा, आठ अ उतारा काढणे असेल अशा ऑनलाईन कामांवर त्याचा खूपच मोठा परिणाम होत आहे.
कळंबट येथे बीएसएनएलचा टॉवर असूनही अनेकदा या टॉवरला नेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने ग्राम पंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विविध सहकारी कार्यकारी सोसायटी, ई-लर्निंग, सरकारमान्य रास्त दराच्या दुकानात थंब मारणे आदी विविध कामे नेट कनेक्टिव्हिटीमुळे रेंगाळत आहेत. त्यामुळे टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला असे म्हणण्याची ग्राहकांवर वेळ आली आहे.
Comments are closed.