PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा निर्णय, किती टक्के व्याज मिळणार
लहान बचत योजना व्याजदर नवी दिल्ली : केंद्र सरकारनं 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी लघू बचत योजनांवरील व्याज दर जाहीर केले आहेत. वित्त मंत्रालयानं 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणाऱ्या तिमाहीसाठी लघू बचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता जुन्याच व्याज दरानं परतावा मिळेलं.
केंद्र सरकारनं गेल्या आठ तिमाहीपासून व्याज दरात बदल केलेले नाहीत. केंद्रानं लघू बचत योजनांवरील व्याज दर 2023-24 मध्ये चौथ्या तिमाहीत बदलले होते. तेव्हापासून गुंतवणूकदार नव्या व्याज दरांची प्रतीक्षा करत आहेत. आता देखील त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.
किती व्याज दर मिळतो?
वेगवेगळ्या योजनांसाठी केंद्राकडून वेगवेगळं व्याज दिलं जातं. सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना 8.2 टक्के व्याज दर मिळतो. त्याचवेळी तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 7.1 टक्के परतावा दिला जातो. ही योजना सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
पब्लिक प्रॉविडंट फंड व्याज दर 7.1 टक्के ठेवण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के व्याज मिळेल. तर, किसान विकास पत्र यावर 7.5 टक्के व्याज दर मिळेल. किसान विकास पत्रातील गुंतवणूक 115 महिन्यात दुप्पट होते. ही योजना ग्रामीण भागात आणि छोट्या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
राष्ट्रीय बचतपत्रातील गुंतवणुकीवर 7.7 टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत व्याज दर 7.4 टक्के परतावा मिळेल. या दोन्ही योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी चांगली मानली जाते. ज्यात नियमित गुंतवणूक आणि सुरक्षित परतावा मिळतो.
गुंतवणूकदारांची प्रतीक्षा वाढली
सरकारच्या या निर्णयामुळं हे स्पष्ट झालंय की व्याज दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. लोक सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यांच्यासाठी या योजना विश्वासार्ह आहेत. मात्र, अधिक परताव्याची अपेक्षा करणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.