2 मुलांचा बाप असलेल्या क्रिकेटरवर बॉलिवूड अभिनेत्रीचा जीव जडला, हिंदू धर्म सोडून मुस्लिम झाली अ
पहिल्या दृष्टीक्षेपात क्रिकेटपटू प्रेम: क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे नेहमीच घट्ट नाते राहिले आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेटरांच्या प्रेमात पडल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. त्यामुळे क्रिकेटर आणि बॉलिवूडमधील अभिनेत्रींमध्ये अफेअर असणं आता कॉमन देखील वाटू लागलंय. काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या प्रेमात पडली होती. मोहम्मद अझरुद्दीनचे लग्न झालेले असूनही त्याने संगीता बिजलानीला होकार दिला होता.
… तेव्हा अझरुद्दीन दोन मुलांचा बाप होता
खरं ते तर, 1985 साल होतं. जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्यावेळी त्याची भेट बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्याशी झाली. तो पहिल्या नजरेतच संगीताच्या प्रेमात पडला होता. मोहम्मद अझरुद्दीनचे पहिले लग्न नौरीनसोबत झाले होते. जेव्हा तो संगीताला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो विवाहित होता आणि दोन मुलांचा बापही होता. संगीताच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडल्याचं खुद्द अझरनं म्हटलं होतं.
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला अन् संगीतासोबत केले लग्न
संगीताला भेटल्यानंतर अझरुद्दीन तिला खूप वेळ देऊ लागला होता. सातत्याने त्यांच्या भेटीगाठी सुरु झाला होत्या. अभिनेत्री संगीताही त्याच्या प्रेमात पडली होती. 1994-1995 दरम्यान त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. 1996 मध्ये संगीता अझरुद्दीनसोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. यानंतर दोघांचे अफेअर असल्याचे सर्वांना कळले. अझरुद्दीनने 1996 मध्ये नौरीनसोबतचे नाते संपुष्टात आणले, तिला घटस्फोट दिला आणि संगीतासोबत लग्न केले.
अझरुद्दीनसाठी संगीताने स्वीकारला इस्लाम धर्म
अझरुद्दीनसोबत लग्न करण्यासाठी संगीताने आधी इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव आयेशा बेगम ठेवले. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2010 मध्ये दोघे वेगळे झाले. पण 2014 च्या निवडणुकीत संगीताने अझरुद्दीनचा प्रचार केला होता. संगीता आणि अझरुद्दीन विभक्त होण्याचे कारण ज्वाला बुट्टो ही बॅडमिंटनपटू होती, असे म्हटले जाते. अझरुद्दीन आणि ज्वाला यांचे प्रेमसंबंध होते, अशा चर्चा रंगल्या होत्या.
तेव्हा दिग्दर्शक चारवेळा म्हणाला, तुझं अंतर्वस्त्र दिसलं पाहिजे; फिल्मफेअर विजेत्या अभिनेत्रीने केला धक्कादायक गौप्यस्फोट!https://t.co/ffmwccrfpl
— ABP माझा (@abpmajhatv) मार्च 14, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
IPL 2025 Mumbai Indians: हार्दिक पांड्यावर बॅन, CSK विरुद्ध कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार?
अधिक पाहा..
Comments are closed.