लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा दिग्गज संतापला; गौतम गंभीरच्या रणनीतीवर थेट बोट, चॅम्पियन ख
मोहम्मद कैफ टीम इंडियावर नाराज 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवानंतर आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 17 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा विजयाचा अश्वमेध अखेर रोखला गेला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर-8 फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली असून, माजी दिग्गज फलंदाज मोहम्मद कैफ याने टीम इंडियाच्या रणनीतीवर आणि संघरचनेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सलग 17 विजयांची मालिका खंडित
2023 च्या विश्वचषकानंतर भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमधील आयसीसी स्पर्धांमध्ये अपराजित होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह तज्ज्ञांनीही संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हणाले मोहम्मद कैफ?
संघाच्या पराभवानंतर मोहम्मद कैफने सोशल मीडियावर आपली परखड मते मांडली. कैफच्या मते, भारतीय टॉप ऑर्डरमध्ये डावखुऱ्या फलंदाजांची अतिसंख्या असणे हे संघाच्या पराभवाचे मुख्य तांत्रिक कारण ठरत आहे. “भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये खूप जास्त डावखुरे फलंदाज आहेत. यामुळे प्रतिस्पर्धी संघाला रणनीती आखणे सोपे जाते. विशेषतः ऑफ-स्पिनर्सचा वापर करून मॅच-अप तयार करण्याची संधी विरोधी संघाला मिळते. संघात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे,” असे कैफने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारताकडे अव्वल क्रमवारीत बरेच डावखुरे आहेत – यामुळे प्रतिस्पर्ध्यांना डावपेच आखणे आणि ऑफ-स्पिनर्सना आदर्श मॅच-अप म्हणून निवडणे सोपे होते. मिक्समध्ये संजू सॅमसन जोडल्यास मदत होऊ शकते.
— मोहम्मद कैफ (@MohammadKaif) 22 फेब्रुवारी 2026
संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी
संघातील हे असंतुलन दूर करण्यासाठी कैफने यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला तातडीने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे. संजू सॅमसन हा उजव्या हाताचा फलंदाज असल्याने आणि फिरकीपटूंविरुद्ध त्याचा रेकॉर्ड चांगला असल्याने, तो संघात आल्यास टॉप ऑर्डरमध्ये वैविध्य येईल आणि ऑफ-स्पिनर्सचा धोका कमी होईल, असा कैफचा दावा आहे.
भारताला मिळालेला सर्वात मोठा धक्का (IND vs SA T20 World Cup 2026)
सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 187 धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 111 धावांवर गारद झाला. परिणामी भारताला 76 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.