ऑस्ट्रेलियात मोहम्मद रिझवानचा भर मैदानात अपमान! बाद नसतानाही संघाने का बोलावले तडकाफडकी बाहेर
पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohmmed Rizwan) ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एका मानहानीकारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. बिग बॅश लीगमध्ये (BBL) सिडनी थंडरविरुद्ध खेळताना मेलबर्न रेनेगेड्सच्या संघ व्यवस्थापनाने रिझवानला फलंदाजी करत असतानाच अचानक मैदानातून बाहेर बोलावले.
मेलबर्न रेनेगेड्सकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रिझवान अत्यंत संथ गतीने खेळत होता. त्याने 23 चेंडूत केवळ 26 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला खरा, पण त्याने अनेक चेंडू निर्धाव (Dot Balls) घालवले. यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या फलंदाजावर धावांचा दबाव वाढत होता.
संघाची धावगती वाढवण्यासाठी मॅनेजमेंटने त्याला ‘रिटायर्ड आउट’ (Retired Out) करण्याचा मोठा निर्णय घेतला. मैदानाबाहेर बोलावल्यामुळे रिझवान स्वतः चकित झाला होता, पण त्याला नाईलाजाने ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले. नियमांनुसार, एकदा रिटायर्ड आउट झालेला खेळाडू पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.
मोहम्मद रिझवानसाठी यंदाचा बिग बॅश लीगचा हंगाम अत्यंत खराब राहिला आहे. 8 सामने खेळूनही त्याला एकदाही 50 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. त्याचा स्ट्राईक रेटही खूपच कमी राहिला आहे. तो सध्या पाकिस्तानच्या टी-20 संघातूनही बाहेर आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी मजबूत करण्याची रिझवानकडे ही मोठी संधी होती, परंतु या खराब कामगिरीमुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Comments are closed.