'आम्ही चूकलो, भारताने चांगली….', पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिजवानचे स्पष्ट वक्तव्य
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केले. सामन्यानंतर मोहम्मद रिझवानने त्यांच्या संघाने कुठे चूक केली हे सांगितले. त्याच्या मते, विराट कोहली आणि शुबमन गिलने त्याच्या संघाकडून सामना हिरावून घेतला.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मते, तो नाणेफेक जिंकण्याचा फायदा घेऊ शकला नाही. सामन्यानंतर तो म्हणाला, “आम्ही नाणेफेक जिंकली, पण आम्हाला नाणेफेकीचा फायदा मिळाला नाही. त्यांच्या (भारत) गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली.”
आम्हाला (मी आणि सौद शकील) डाव शेवटपर्यंत घेऊन जायचे होते. पण आमची शॉट सिलेक्शन खराब होती. त्यांनी आमच्यावर दबाव आणला. जेव्हा जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही. आम्हाला दबाव निर्माण करायचा होता, पण आम्ही ते करू शकलो नाही.
रिजवान पुढे म्हणाला, “विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी खूप चांगली फलंदाजी केली. दोघांनीही आमच्या संघाकडून सामना हिरावून घेतला. आम्हाला आमचे क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज आहे. या सामन्यात आम्ही खूप चुका केल्या आहेत.”
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबर आझमच्या रूपाने पाकिस्तानला पहिला धक्का खूप लवकर बसला. 23 धावा काढल्यानंतर तो हार्दिक पांड्याचा बळी ठरला. यानंतर, इमाम उल हकला अक्षर पटेलने धावबाद केले. सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागीदारी करून संघाला निश्चितच स्थिरावले परंतु त्यांना जलद गतीने धावा करण्यात अपयश आले. अक्षर पटेलने ही भागीदारी मोडली आणि रिझवानला बाद केले.
पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा सौद शकीलने केल्या, त्याने 62 धावांची खेळी खेळली. त्याला हार्दिक पांड्याने बाद केले. हार्दिक पांड्याने सामन्यात 2 विकेट घेतल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेगवान सुरुवात केली. रोहित 20 धावा करून बाद झाला. शुबमन गिल 46 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने आपले शतक पूर्ण केले. याआधी त्याने 14 धावा करत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 14 हजार धावा पूर्ण केल्या. श्रेयस अय्यरने 56 धावांची खेळी केली. आशाप्रकारे भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.
हेही वाचा-
विराट कोहलीचे पाकिस्तानविरुद्ध शतक! 5 मोठ्या रेकाॅर्डवर कोरले नाव
टीम इंडियाची दमदार झेप; गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मजल
कोहलीच्या स्पोर्ट्समॅनशिपची चर्चा! पाकिस्तानी खेळाडूंसाठी विराटचे प्रेम की खेळातील बंधुत्व?
Comments are closed.