शेर अभी जिंदा है! मोहम्मद शमीला 9 विकेट्स, रणजी सामन्यात धारदार गोलंदाजी, धुरंधर कामगिरीने BCCI
मोहम्मद शमी 9 विकेट्स बातम्या : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या निवडकर्त्यांच्या रडारबाहेर असल्याचं चित्र आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही त्याचं नाव वगळण्यात आलं. मात्र, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांदरम्यानही शमीची धार अजिबात कमी झालेली नाही. उलट त्याने रणजी ट्रॉफीत आपल्या घातक गोलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडल्यानंतर जम्मू-काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात त्याने 8 विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
बरोबर पैशावर! 👊
मोहम्मद पहा. शमीने बंगालला दिला सकाळचा पहिला ब्रेकथ्रू!
अपडेट्स ▶️ https://t.co/QXyCuRHJ6e#रणजीट्रॉफी | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Vk3sQgq0tE
— BCCI डोमेस्टिक (@BCCIdomestic) 18 फेब्रुवारी 2026
2025 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघाबाहेर…
गेल्या वर्षाच्या सुरुवातीला शमी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग होता. त्या स्पर्धेत तो चक्रवर्तीसह संयुक्तरीत्या सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. मात्र, या स्पर्धेनंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं. फिटनेससंदर्भातील संभ्रमामुळे त्याने संघ व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करूनही गेल्या वर्षभरात त्याला टीम इंडियात पुनरागमनाची संधी मिळाली नाही. एवढंच नव्हे, तर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
रणजी उपांत्य फेरीत शमीचा कहर
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बंगाल आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात शमीचा भेदक अवतार पाहायला मिळाला. पहिल्याच डावात त्याने तब्बल 8 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाची कंबर मोडली. पारस ढोगरा आणि अब्दुल समद यांनी अर्धशतकं झळकावत जम्मू-काश्मीरचा डाव 302 धावांपर्यंत नेला, मात्र शमीच्या 8 आणि मुकेश कुमारच्या 2 बळींमुळे संपूर्ण संघ 302 धावांवर गारद झाला.
फलंदाजीनेही लक्ष वेधून घेतले….
शमी केवळ गोलंदाजीनेच नाही, तर फलंदाजीनेही लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच त्याने तुफानी अर्धशतक झळकावत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. जम्मू-काश्मीरविरुद्ध बंगालची सुरुवात काहीशी खराब झाली. त्यामुळे शमीला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाल्यास तो काय कमाल करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सामन्यात त्याने एकूण 9 विकेट्स घेतले. दुसऱ्या डावात त्याने फक्त 1 विकेट घेतला.
जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने इतिहास रचला
जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. 2025-26 रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात त्यांनी बंगालवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह, संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. जम्मू आणि काश्मीरसमोर 126 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी फक्त 4 विकेट्स गमावून साध्य केले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.