भारत-पाकिस्तान सामन्यावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य! म्हणाला…

पाकिस्तान विरुद्ध भारत विषयी मोहम्मद शमी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग’मध्ये भारतीय संघाच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता.

त्यानंतर आशिया कप 2025 मध्येही हे दोन्ही देश एकमेकांविरुद्ध खेळणार नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, भारत सरकारने नुकतेच एक निवेदन जारी करत सांगितले आहे की, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानवर बहिष्कार घालणार नाही. (India Pakistan boycott)

दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने ‘न्यूज 24’ला दिलेल्या मुलाखतीत भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. शमी म्हणाला की, “सरकार आणि बोर्ड जे सांगतात त्यानुसार आपण चालायला हवे.” तो पुढे म्हणाला की, “भावनांमध्ये वाहून असे निर्णय घेतले जात नाहीत, अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. जेव्हा सर्वजण खेळण्यास तयार असतील, तेव्हाच आपण पाकिस्तानसोबत खेळायला हवे.” (Mohammed Shami interview)

Comments are closed.