गुवाहाटी एअरपोर्टवर ड्रामा! मोहम्मद सिराज 4 तास अडकला, Air India वर काढला राग, नेमकं काय घडलं?
मोहम्मद सिराज एअर इंडिया एक्सप्रेसने गुवाहाटी-हैदराबाद उड्डाण रद्द केले: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात आफ्रिकन संघाने तब्बल 408 धावांनी विजय मिळवत मालिका 2-0 ने खिशात घातली. मात्र सामना संपताच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सोशल मीडियावर चांगलाच भडकलेला दिसला आणि त्यामागचं कारण क्रिकेटशी संबंधित नव्हतं.
फ्लाइट उड्डाणात झालेल्या विलंबामुळे भडकला सिराज
गुवाहाटी कसोटीमध्ये प्लेइंग XI चा भाग असलेला सिराज सामना संपल्यानंतर थेट हैदराबादला रवाना होणार होता. यासाठी त्याने एअर इंडिया फ्लाइट IX 2884 बुक केली होती, ज्याचे उड्डाण वेळापत्रकानुसार सायंकाळी 7:25 वाजता होते. पण, फ्लाइट वेळेवर उडाली नाही. सतत विलंब होत राहिला. 4 तास उलटून गेले तरी अपडेट नाही. एअरलाइनकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. यामुळे वैतागलेल्या सिराजने ‘एक्स’वर पोस्ट करत चांगलाच संताप व्यक्त केला.
मोहम्मद सिराज काय म्हणाला?
सिराजने लिहिले की, “गुवाहाटी–हैदराबाद एअर इंडिया फ्लाइट IX 2884 ला 7:25 ला उड्डाण करायचे होते. पण एअरलाइनकडून कोणतेही अपडेट नाही. सतत संपर्क साधूनही योग्य कारण दिले जात नाही. चार तास झाले, प्रवासी अडकले आहेत. मी खरंच कोणालाही या फ्लाइटने प्रवास करण्याचा सल्ला देणार नाही, जोपर्यंत हे लोक ठोस पावले उचलत नाहीत.”
एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक IX 2884 गुवाहाटीहून हैदराबादला 7.25 वाजता उड्डाण करायचे होते परंतु एअरलाइनकडून कोणताही संवाद झाला नाही आणि वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी कोणतेही योग्य कारण नसताना फ्लाइटला उशीर केला. हे खरोखरच निराशाजनक आहे आणि…
— मोहम्मद सिराज (@mdsirajofficial) २६ नोव्हेंबर २०२५
सिराजच्या तक्रारीनंतर एअर इंडियाची प्रतिक्रिया
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सोशल मीडियावर विमानाच्या विलंबाबद्दल संताप व्यक्त केल्यानंतर, एअर इंडियाने त्यांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी कळवले की गुवाहाटीहून हैदराबादला जाणारी त्यांची फ्लाइट IX 2884, ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की टीम इंडिया 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्यासाठी मोहम्मद सिराज संघाचा भाग नाही.
झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, मिस्टर सिराज. आम्हाला कळवण्यास खेद होत आहे की, अनपेक्षित ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. विमानतळावरील आमची टीम सर्व पाहुण्यांना आवश्यक व्यवस्थेसह सक्रियपणे मदत करत आहे. आम्हाला समजते की किती कठीण आहे …
– एअर इंडिया एक्सप्रेस (@AirIndiaX) २६ नोव्हेंबर २०२५
हे ही वाचा –
Gautam Gambhir Video : पराभव होताच गौतम गंभीरला चाहत्यांनी मैदानात घेरलं; हाय… हायचे नारे; टीम इंडियाचे खेळाडू आले धावून, मोहम्मद सिराजने जे केलं…
आणखी वाचा
Comments are closed.