ऐतिहासिक! सिराजने एजबॅस्टनमध्ये रचला नवा इतिहास, कपिल देवचा 46 वर्षांचा 'हा' रेकाॅर्ड मोडला
मोहम्मद सिराज रेकॉर्ड: भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टनमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मध्ये जसप्रीत बुमराहचे नाव नसल्याने चाहते आश्चर्यचकित झाले होते. कर्णधार गिलने सांगितले होते की, वर्कलोड व्यवस्थापनासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्याची उणीव कोण भरून काढेल हा प्रश्न होता. सर्वांना वरिष्ठ गोलंदाज मोहम्मद सिराजकडून अपेक्षा होती. सिराज या अपेक्षांवर खरा उतरला. त्याने पहिल्या डावात 6 विकेट्स घेऊन इतिहास रचला. सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचे स्टार खेळाडू गारद झाले. (Mohammed Siraj 6 wickets Edgbaston)
उजव्या हाताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 6 विकेट्स घेऊन केवळ भारतीय संघाचे पुनरागमनच केले नाही, तर या मैदानावर माजी कर्णधार कपिल देवचा 46 वर्षांचा जुना रेकाॅर्ड मोडला. आता एजबॅस्टनच्या मैदानावर सिराज सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीच्या बाबतीत कपिल देवच्या पुढे निघून गेला आहे. (Mohammed Siraj breaks Kapil Dev record)
या ऐतिहासिक मैदानावर कपिल देवने आजपासून 46 वर्षांपूर्वी जुलै 1979 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्या डावात 48 षटके टाकली होती, ज्यात 146 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. आता सिराजने 19.3 षटकात 70 धावा देऊन 6 विकेट्स मिळवत कपिल देवला मागे टाकले आहे. सिराजने ईशांत शर्मालाही मागे टाकले, ज्याने या मैदानावर ऑगस्ट 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 13 षटकांत 51 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. (Mohammed Siraj Test performance)
एजबॅस्टनमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल माजी गोलंदाज चेतन शर्माच्या नावावर आहे, ज्याने 1986 मध्ये 58 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. (Chetan Sharma bowling record) 1986 नंतर एजबॅस्टनमध्ये कोणत्याही भारतीयाने केलेली सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आता सिराजच्या नावावर झाली आहे. विशेष बाब म्हणजे, 1993 नंतर या मैदानावर कोणत्याही परदेशी वेगवान गोलंदाजाने पहिल्यांदाच एका डावात 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे, आणि हा पराक्रम सिराजनेच केला आहे.
एजबॅस्टनमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी असलेले भारतीय गोलंदाज
चेतन शर्मा (6/58) – 1986
मोहम्मद सिराज (6/70) – 2025
इशंत शर्मा (5/51) – 2018
कपिल देव (5/146) – 1979
Comments are closed.