DSP मोहम्मद सिराजसमोर वेस्ट इंडिजची दाणादाण, काही समजण्याआधीच किंगला केलं क्लीन बोल्ड, पाहा Vid


मोहम्मद सिराज इंड वि. डब्ल्यूआय प्रथम चाचणी: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies Score) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाला आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर दबाव टाकला असून, मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करत केवळ 6 षटकांत 3 विकेट घेतले आहेत. त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची कंबरडेच मोडून टाकले आहे.

भारताच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं

वेस्ट इंडिजच्या कर्णधार रोस्टन चेजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. पहिलं सत्र पूर्णपणे भारताच्या गोलंदाजांच्या नावे गेलं आहे. सामन्याच्या चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने तेजनारायण चंद्रपॉलला बाद करत भारताला पहिली यश मिळवून दिले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजला दुसरा धक्का दिला, त्याने जॉन कॅम्पबेलला 20 धावांवर बाद केलं. जसप्रीत बुमराहने जॉन कॅम्पबेलला केवळ 8 धावांवर माघारी पाठवले. सुरुवातीला अंपायरने कॅम्पबेलला नाबाद दिलं होतं, पण भारताने DRS घेतला आणि निर्णय आपल्या बाजूने वळवला.

काही समजण्याआधीच किंगला केलं क्लीन बोल्ड

पुढे, सिराजने पुन्हा एकदा वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला, त्याने ब्रँडन किंगला क्लीन बोल्ड केलं. किंगने 15 चेंडूंमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या होत्या. आत येणाऱ्या चेंडूला किंगने दुर्लक्ष केलं आणि चेंडू थेट स्टंपवर लागला. त्यानंतर मैदानात आलेल्या अथानाझेने थोडीफार झुंज दिली, पण तोही केवळ 12 धावांवर के.एल. राहुलकडे झेल देत बाद झाला.

कर्णधार रोस्टन चेज आणि शाई होपने डाव सावरला, पण….

42 धावांवर 4 गडी गमावलेल्या वेस्ट इंडिजचा कर्णधार चेज आणि होपने डाव सावरला, वेस्ट इंडिजने 42 धावांवर 2 गडी गमावले होते, तेव्हा कर्णधार रोस्टन चेज आणि अनुभवी शाई होपने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून संयमी फलंदाजी करत 48 धावांची भागीदारी रचली. मात्र, ही जोडी कुलदीप यादवने तोडली. 24व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुलदीपने शाई होप (26) ला बोल्ड केलं. होपने आपल्या 36 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार लगावले. या विकेटनंतर पहिल्या सत्राचा खेळ संपला. भारताच्या गोलंदाजांनी या सत्रात चांगलाच प्रभाव टाकला असून वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली आहे.

तीन फिरकीपटू, दोन वेगवान गोलंदाज अन्…

सामन्यात भारत दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंनी उतरला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज आहेत, तर फिरकी विभागाची धुरा उपकर्णधार रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे आहे. नीतिश रेड्डी अष्टपैलू म्हणून खेळत आहेत.

हे ही वाचा –

Ind vs Pak : ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या मोहसीन नक्वीला शोएब अख्तरने सुनावलं, नको नको ते बोलला, सगळ्या मर्यादा ओलांडल्या!

आणखी वाचा

Comments are closed.