Video : अरे मोहम्मद सिराज तू काय केलंस? कॅच नाही तर मॅच सोडली, प्रसिद्ध कृष्णाचा पडला चेहरा
इंग्लंड विरुद्ध भारत 5 वा कसोटी अद्यतनः इंग्लंडने भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात 374 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात दुपारच्या सत्रापर्यंत 3 गडी गमावत 164 धावा केल्या आहेत. इंग्लंड सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यांना सामना जिंकण्यासाठी आणखी 210 धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी फक्त 7 गडी बाद करायचे आहेत. या सत्रात इंग्लंडने 114 धावा केल्या, तर भारताला दोन महत्त्वाचे बळी मिळाले. लंचच्या वेळी जो रूट 23 धावांवर तर हॅरी ब्रूक 38 धावांवर नाबाद आहेत.
डकेट-पोप OUT, पण ब्रूकने केला प्रहार
भारताने सकाळच्या सत्रात बेन डकेट (54) आणि ओली पोप (27) यांना बाद करत काहीसा दाब निर्माण केला. मात्र, हॅरी ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक मोठी संधी मोहम्मद सिराजने गमावली.
बाहेर? सहा!?
सिराजने काय केले 😱 pic.twitter.com/hp6io4x27l
– इंग्लंड क्रिकेट (@एन्ग्लँडक्रिकेट) 3 ऑगस्ट, 2025
सिराजची बाउंड्रीलिल वगळता
इंग्लंडच्या डावाचा 35 वा षटक प्रसिद्ध कृष्णा टाकत होता. पहिल्या चेंडूवर हॅरी ब्रूकने पुल शॉट खेळला, पण चेंडू बॅटला टॉप एज लागून थेट सीमारेषेच्या दिशेने गेला. मोहम्मद सिराज तिथे उपस्थित होता आणि त्याने उत्तम झेल पकडला. मात्र झेल घेताना त्याच्या पायाचा स्पर्श बाउंड्री रोपला झाला आणि त्यामुळे तो झेल बाद ठरला नाही.
प्रसिद्ध कृष्णा आधीच जल्लोष करत होता, पण नंतर जेव्हा समजले की झेल वैध राहिलेला नाही, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरने यावेळी डोक्याला हात लावला. पण यानंतर मोहम्मद सिराजने प्रसिध्द कृष्णाची माफी मागितली, ब्रूकची ही विकेट भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती. जर तो अजून काही वेळ असा आक्रमक खेळत राहिला, तर सामना भारताच्या हातातून निसटण्याची शक्यता निर्माण होईल.
सामन्याचा आत्तापर्यंतचा आढावा
इंग्लंडने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजी दिली.भारताचा पहिली डाव 224 धावांवर आटोपला. तर इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला. भारताने दुसऱ्या डावात 396 धावा करत इंग्लंडपुढे 374 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. सध्या सामना अत्यंत रोमहर्षक वळणावर आहे. दोन्ही संघ पूर्ण ताकदीने खेळत आहेत आणि निकाल कोणत्याही बाजूला झुकू शकतो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.