DSP सिराजला पोलीस दलातील नोकरीतून किती पगार मिळतो? 8 वा वेतन आयोगानंतर किती पगार वाढणार?
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिरजानं अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत दमदार कामगिरी केली. सिराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. सिराजला ओव्हल कसोटीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडमधील दमदार कामगिरीमुळं मोहम्मद सिराज ट्रेंडमध्ये आहे. सिराजच्या शानदार कामगिरीमुळं भारतानं ओव्हल कसोटीत विजय मिळवला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.
तेलंगाना सरकारनं मोहम्मद सिराजची नियुक्ती पोलीस उपाधीक्षक पदावर केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाला कामगिरीच्या जोरावर मोहम्मद सिराजनं विजय मिळवून दिलेला आहे. त्याच्या या कामगिरीमुळं सिराजला तेलंगाणा सरकारनं पोलीस सेवेत संदी दिली आहे. त्यामुळं मोहम्मद सिराजला पोलीस दलातील नोकरीतून किती पगार मिळतो आणि जेव्हा आठवा वेतन लागू होईल तेव्हा त्याचा पगार किती रुपयांनी वाढणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. य में कितना इजाफा हो सकता है?
तेलंगानामध्ये DSP ला किती पगार मिळतो?
सध्या मोहम्मद सिराजला डीएसपी म्हणून 58850 ते 137050 या वेतनश्रेणीनुसार पगार मिळतो. याशिवाय एचआरए, वैद्यकीय खर्च भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर भत्ते मिळतात. हा पगार 7 व्या वेतन आयोगानुसार आहे. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता.
8 व्या वेतन आयोगात किती पगार वाढणार?
जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 असल्यास मोहम्मद सिराजसह डीएसपी अधिकाऱ्यांच्या पगारात चागंली वाढ होईल. त्याचं किमान वेतन 80 हजार रुपये असेल. तर कमाल वेतन 1.85 लाख रुपयांवर जाईल.
मोहम्मद सिराजचं करिअर
मोहम्मद सिराज हा मूळचा हैदराबादचा असून सध्या टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचं नेतृत्त्व करत आहेत. मोहम्मद सिराजचे वडील ऑटो चालव होते. तर, सिराजची आई गृहिणी होती. आर्थिक अडचणी असून देखील परिस्थिती सोबत संघर्ष करुन सिराजनं टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज असं नाव कमावलं आहे. मोहम्मद सिराज आता प्रमुख गोलंदाजचं नाही तर युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.