टॉप 10 सोडा, टॉप 20 मध्येही नाही…आयसीसी कसोटी क्रमवारीत मोहम्मद सिराज कोणत्या स्थानावर?, पाहा
इंडेंट वि इंजिन टेस्ट मोहम्मद सिराज: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात (India vs England 5th Test) भारताने 6 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स पटकावल्या. तसेच इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत मोहम्मद सिराजने एकूण 23 विकेट्स घेतल्या. दरम्यान, या कामगिरीनंतर मोहम्मद सिराजचे कौतुक होत आहे. तर आयसीसीची कसोटी क्रमवारी देखील समोर आली आहे.
मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध या मालिकेतील सर्व 5 सामने खेळले. या मालिकेत त्याने 1100 हून अधिक चेंडू टाकले आणि एकूण 23 विकेट्स घेतल्या. आयसीसी पुरुषांची कसोटी क्रिकेटमधील क्रमवारी आता 6 ऑगस्ट रोजी अपडेट केली जाईल, ज्यामध्ये मोहम्मद सिराजला या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमुळे फायदा होऊ शकतो. यापूर्वी, कसोटीतील अव्वल 10 गोलंदाज कोण आहेत आणि मोहम्मद सिराज कोणत्या स्थानावर आहे? जाणून घ्या…
आयसीसी कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज कोण आहे?
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील नंबर-1 गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहचे रेटिंग 898 आहे. अव्वल कसोटी गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, त्यानंतर दुसरा भारतीय रवींद्र जडेजा 14 व्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या टॉप-10 वेगवान गोलंदाजांची यादी-
जसप्रीत बुमराह- भारत
कागिसो रबाडा- दक्षिण आफ्रिका
पॅट कमिन्स- ऑस्ट्रेलिया
जोश हेजलवुड- ऑस्ट्रेलिया
नोमन अली-पाकिस्तान
स्कॉट बोल्ड- ऑस्ट्रेलिया
मॅट हेन्री- न्यूझीलंड
नॅथन लायन- ऑस्ट्रेलिया
मार्को जॅन्सन- दक्षिण आफ्रिका
मिशेल स्टार्क- ऑस्ट्रेलिया
आयसीसी रँकिंगमध्ये मोहम्मद सिराज कोणत्या क्रमांकावर?
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत 8 विकेट्स घेऊन सामनावीर ठरलेला मोहम्मद सिराज सध्या टॉप-20 मध्येही नाहीय. मोहम्मद सिराज सध्या 27 व्या स्थानावर आहे, मोहम्मद सिराजचे रेटिंग 605 आहे.
मोहम्मद सिराज काय म्हणाला?
या सामन्यात मोहम्मद सिराजने 190 धावा देऊन 9 विकेट घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की, की, प्रामाणिकपणे सांगायचं तर, हा क्षण खूपच अद्भुत आहे. पहिल्या दिवसापासूनच आम्ही लढणार… हाचा निर्धार केला होता आणि आज त्याचं असं फळ मिळालं हे पाहून खूप छान वाटतंय.मी फक्त चांगल्या टप्यावर चेंडू टाकण्यावर लक्ष केंद्रित केलं. माझ्या मनात खात्री होती की मी हे करू शकतो. मी गुगलवरून believed हा एक फोटो डाउनलोड केला, आणि माझ्या मोबाईलवर वॉलपेपर म्हणून ठेवला होता, की हो, मी हे करू शकतो, असं मोहम्मद सिराज म्हणाला.
https://www.youtube.com/watch?v=cgelvah5uq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.