गोलंदाज असूनही मोहम्मद सिराजने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला; नेमका कोणता पराक्रम केला?

मोहम्मद सिराजने सुश्री धोनीचा विक्रम मोडला: इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी केली. या मालिकेत त्याने एकूण 185.3 षटकं टाकून 23 विकेट्स घेतले. विशेषतः ओव्हल टेस्टमध्ये भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. या सामन्यानंतर सिराजने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला, परदेशात सर्वाधिक टेस्ट सामने जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने माही म्हणजेच एम.एस. धोनीला मागे टाकलं आहे.

धोनीचा विक्रम सिराजने मोडला

मोहम्‍मद सिराजसाठी परदेशात ही 12वा कसोटीत विजय ठरला. याआधी धोनीने परदेशात खेळलेल्या 48 टेस्टपैकी 11 विजय मिळवले होते. सिराजने आतापर्यंत परदेशात 27 टेस्ट सामने खेळले असून त्यात 10 सामने गमावले आणि 5 ड्रॉ झाले. विशेष म्हणजे, या आकड्यांमध्ये सिराजने जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. बुमराहच्याही नावावर परदेशातील 12 कसोटी विजय आहेत. एकूण कसोटीत म्हणजे भारतात आणि परदेशात क्रिकेटमध्ये सिराजसाठी हा 22वा विजय आहे, ज्यामुळे त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

‘द वॉल’ राहुल द्रविड पहिल्या स्थानी

भारतीय खेळाडूंमध्ये परदेशात सर्वाधिक टेस्ट सामने जिंकण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने आपल्या कारकिर्दीत परदेशात 93 टेस्ट सामने खेळले आणि त्यात 24 विजय मिळवले. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने परदेशात 68 टेस्ट खेळून 23 विजय मिळवले आहेत.

ओव्हल टेस्टमध्ये सिराजचा झंझावात

ओव्हलमध्ये झालेल्या अंतिम कसोटीत सामन्यात मोहम्मद सिराजने दोन्ही डाव मिळून एकूण 9 बळी घेतले. पहिल्या डावात त्याने 86 धावा देऊन 4 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात 104 धावा देऊन 5 बळी घेतले. या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णानेही प्रभावी कामगिरी करत 8 बळी मिळवले.

हे ही वाचा –

Ind vs Eng 5th Test : गंभीरला भिडला, शेवटच्या दिवशी ‘ती’ चालही खेळली; पण शेवटी त्याचीच चूक नडली, सामना कसा पलटला? मोठं कारण समोर

आणखी वाचा

Comments are closed.