दहशतवाद्यांना धडा शिकवणं आमचा धर्म, पहलगाम हल्ल्यावर सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

पहलगम दहशतवादी हल्ला मोहन भागवत: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तानवर संताप व्यक्त करत आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अहिंसा हा आमचा स्वधर्म आहे. मात्र, दहशतवाद्यांना धडा शिकवणं हा देखील आमचा धर्म आहे,अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पहलगाम हल्ल्यावर निषेध व्यक्त केलाय. आम्ही आमच्या शेजारील देशाचं नुकसान नाही करत पण ते चुकीच्या दिशेनं जात असतील तर प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे. राजा आपलं कर्तव्य बजावणार असं रा. स्व संघाचे मोहन भागवत म्हणालेत. (Pahalgam Attack)

काय म्हणाले मोहन भागवत?

रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला. देवाने त्याचा संहार केला. ही हिंसा नाही अहिंसा आहे. अहिंसा आपला धर्म आहे. पण अत्याचार करणाऱ्याला धर्म शिकवणं  अहिंसाच आहे. आम्हाला आमच्या शेजारील देशाचं नुकसान करायचं नाही. यानंतरही कोणी चुकीच्या रस्त्याने जाताना दिसलं तर राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं आहे. राजा त्याचं काम करेल.’ असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

‘धर्म आणि अधर्मातील लढाई’ मोहन भागवत म्हणाले…

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले, हा हल्ला धर्म आणि अधर्म यांच्यामधील लढाई आहे, याची आठवण करून देतो. लोकांना धर्माबद्दल विचारण्यात आले आणि नंतर त्यांना मारण्यात आले. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप  नाही. द्वेष आणि शत्रूत्व जसे आपल्या संस्कृतीत नाही. तसेच शांतपणे नुकसान सहन करणं हे ही आपल्या संस्कृतीत नाही. आपल्या सर्वांच्या हृदयात वेदना आहेत. आपण सारे संतापलो आहोत. वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.’

ते पुढे म्हणाले, रावणाने आपला विचार बदलण्यास नकार दिल्याने त्याला मारण्यात आले. कोणताही पर्याय उरला नव्हता. रामाने मारले पण त्यालाही सुधारण्याची संधीही देण्यात आली, जेंव्हा त्याने सुधारणा केली नाही तेव्हा त्याला मारण्यात आले. मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्यावर आम्हाला कठोर उत्तराची अपेक्षा असल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थाने अहिंसक व्यक्तीनेही बलवान असलं पाहिजे. जर ताकद नसेल तर पर्याय नाही पण जेंव्हा ताकद असेल तेंव्हा गरज पडेल तेव्हा ती दिसली पाहिजे.

https://www.youtube.com/watch?v=YD4BB4MW6FU

हेही वाचा:

Prakash Mahajan On Sharad Pawar: महिला म्हणाल्या, टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे?, प्रकाश महाजनांचा सवाल

अधिक पाहा..

Comments are closed.