यूपीएससी परीक्षेत मोहित अग्रवाल, काशिस कसाना देशात अव्वल
आयईएस, आयएसएस विभागांचा निकाल जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) 2025 च्या लेखी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर केले. युपीएससी 2025 च्या जाहीर झालेल्या निकालानुसार आयईएस विभागात मोहित अग्रवाल नदबईवाला याने पहिले स्थान पटकावले आहे. तर, ऊर्जा रहेजा दुसऱ्या स्थानावर असून गौतम मिश्रा तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) 2025 साठी झालेल्या परीक्षेत कशिस कसानाने देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यानंतर, आकाश शर्मा दुसऱ्या आणि शुभेंदू घोष तिसऱ्या स्थानावर आहे.
आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी उमेदवारांची निवड अंतिम करण्यात आली आहे. मूळ कागदपत्रांच्या सांक्षाकिंत प्रती घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल, असे युपीएससीने म्हटले आहे. युपीएससीची ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहता येईल. या पदांसाठी जानेवारी 2025 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर, सप्टेंबर महिन्यात मुलाखत आणि व्यक्ती परीक्षण करण्यात आले. आता, या परीक्षेसाठी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून आयईएस पदासाठी 12 आणि आयएसएस पदासाठी 35 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
Comments are closed.