भारताच्या विजयाचा धसका; मोहसीन नक्वीची गुपचूप एक्झिट; तोंड लपवून स्टेडियममधून काढला पळ, नेमकं क
IND vs PAK मोहसीन नक्वी लाजले : संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यापूर्वी पाकिस्तानकडून बरीच वक्तव्ये झाली. आधी सामना बहिष्काराचा इशारा, त्यानंतर आयसीसीच्या फटकारणीनंतर माघार अशा सगळ्या घडामोडींनी वातावरण तापले होते.
15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या या महामुकाबल्याला पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी स्वतः उपस्थित होते. मात्र सामना जसजसा भारताच्या बाजूने झुकत गेला, तसतसे चित्र बदलत गेले. त्याचवेळी नक्वी सामन्याचा शेवट होण्यापूर्वीच गुपचूप स्टेडियममधून निघून गेल्याची चर्चा रंगली.
T20I मध्ये भारताचा पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय (61 धावा)! 🤯
त्यासह, त्यांनी ते 8-1 इंच केले #INDvPAK ICC पुरुष T20 विश्वचषक आणि सुपर 8 साठी पात्र! 👏
त्यांना पुढील ICC पुरुषांमध्ये पहा #T20WorldCup | #INDvNED | बुध, 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6! pic.twitter.com/na6yc5i7Pz
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 15 फेब्रुवारी 2026
तोंड लपवून स्टेडियममधून काढला पळ
भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 176 धावा केल्या. ईशान किशनच्या 77 धावांच्या दमदार खेळीने भारतीय संघाने विजयाचा पाया रचला. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या दोन षटकांतच त्यांनी तीन गडी गमावले आणि सामना हातातून निसटू लागला. डावाच्या 12व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कुलदीप यादवने मोहम्मद नवाजला बाद केले आणि त्यानंतर काही क्षणांतच मोहसिन नक्वी स्टेडियममधून निघून गेल्याचे वृत्त समोर आले. सामन्याचा निकाल लागण्याआधीच त्यांची गाडी स्टेडियममधून बाहेर पडल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओ | ICC पुरुष T20 विश्वचषक, 2026: PCB प्रमुख मोहसिन नक्वी यांनी आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियम सोडले. #INDvsPAK
(पूर्ण व्हिडिओ PTI व्हिडिओवर उपलब्ध आहे – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/QXbYcjFUCN
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 15 फेब्रुवारी 2026
गट टप्प्यातून बाहेर पडण्याचा धोका
या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा सर्वाधिक फटका त्यांच्या नेट रनरेटला बसला आहे. भारताने विजयासह सुपर-8 मधील स्थान निश्चित केले, तर पाकिस्तान गट-अ मध्ये थेट तिसऱ्या स्थानावर घसरला. दुसऱ्या स्थानावर असलेल्या यूएसएचे गुण समान असले तरी त्यांचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. आता नामिबियाविरुद्धचा पुढील सामना पाकिस्तानसाठी करो किंवा मरो ठरणार आहे. त्या सामन्यात पराभव झाल्यास त्यांचा प्रवास गट टप्प्यातच संपुष्टात येऊ शकतो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.