मोइत्रा स्वतःचे ट्विट हटवण्यास तयार आहे
कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधातील न्यायालयीन लढ्यात एक पाऊल मागे घेत स्वत:चा ट्विट हटविण्याची तयारी दर्शविली आहे. या ट्विटमध्ये मोइत्रा यांनी दुबे यांना ‘फेक डिग्री प्रकारचा व्यक्ती’ संबोधिले होते. महुआ यांच्याप्रमाणेच माजी वित्तसचिव सुभाषचंद्र गर्ग यांनीही स्वत:ची टिप्पणी हटविण्याची विनंती एका पॉडकास्टरला केली आहे. या टिप्पणीत गर्ग यांनी दुबे यांना ‘ब्लॅकमेलिंग करणारा इसम’ ठरविले होते.
Comments are closed.