मान्सून आला रे!

उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा देणाऱया वळवाच्या पावसानंतर आता मान्सूनही केरळ, कर्नाटकमध्ये डेरेदाखल झाला आहे. विशेष म्हणजे या वर्षी तब्बल आठ दिवस अगोदर मान्सून दाखल झाला आहे. शिवाय येत्या आठ दिवसांमध्येच मान्सून कोकणासह मुंबई-महाराष्ट्र व्यापणार आहे.

याआधी 2009 मध्ये 23 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. यानंतर तब्बल 16 वर्षांनंतर मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने शनिवारपासून दक्षिण अरबी समुद्राचा उत्तर भाग, लक्षद्वीप, कर्नाटक, मालदीव आणि तामीळनाडूसह बंगालचा उपसागरात व्यापल्याने ही स्थिती मान्सूनला पोषक आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा देशात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Comments are closed.