IMD Rain Alert : राज्यात वेळेआधीच मान्सूनचे आगमन, मुंबई, पुणेसह काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

केरळनंतर मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधीच प्रवेश केला आहे. हिंदुस्थानी हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी सीमा सध्या राज्याच्या देवगडपर्यंत पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत राज्याच्या इतर भागांतही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत पुढील दोन दिवसांत, म्हणजेच 27 मेपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने रविवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे, तर मुंबई आणि कोकणात सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.
हवामान विभागाकडून रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अर्लट देण्यात आला आहे. तसेच पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
Comments are closed.