Monsoon Fashion Tips : पावसाळ्यासाठी स्पेशल पेस्टल साड्यांचा ट्रेंड

पावसाळ्यात वातावरणातील दमटपणामुळे त्वचेवर चिकटपणा, मुरुमे आणि पुरळ यासारख्या अनेक समस्या उद्भवू लागतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. या सर्व कारणांमुळेच पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पावसाळा सर्वांनाच खूप आल्हाददायक नि हवाहवासा वाटतो. त्यामुळे आपल्याला कडक उन्हापासून आराम मिळतो. मात्र हाच पावसाळा त्वचेच्या अनेक समस्या देखील घेऊन येतो. खरं तर, पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचेशी निगडीत अनेक समस्या उद्भवू लागतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज होते. त्यामुळेच पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी, काही टिप्सचा अवलंब करणे गरजेचे आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक टिकवून ठेवू शकता.

चेहरा स्वच्छ धुवा

पावसाळ्यात ओलाव्यामुळे चेहरा चिकट होतो, त्यामुळे चेहरा नीट स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुवायला विसरू नका. शक्य असल्यास, चांगल्या क्लिंजरने चेहरा स्वच्छ करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवायला विसरू नका.

टोनर लावायला विसरू नका.

पावसाळ्यात मुरुमे आणि पिंपल्स टाळण्यासाठी टोनर वापरा. टोनर आपल्या त्वचेचे पीएच संतुलन राखते आणि चेहऱ्यावरील ओपन पोअर्स कमी करते.

मॉइश्चरायझरही आहे महत्वाचे

पावसाळ्यात मॉइश्चरायझर नक्की लावा. या ऋतूत असे मॉइश्चरायझर लावावे जे त्वचेला तेलकट न बनवता हायड्रेट ठेवेल. यासाठी तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर निवडू शकता.

सनस्क्रीन लावायला विसरू नका

काही जणांना वाटतं की पावसाळ्यात सनस्क्रीन लावण्याची काय गरज आहे ? पण हवामान काहीही असो, चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. सनस्क्रीन एक संरक्षक थर म्हणून काम करते. या ऋतूत ते चेहऱ्याचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते.

एक्सफोलिएट

पावसाळ्यात मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि छिद्रे उघडण्यासाठी त्वचा एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफोलिएट (स्क्रब) केले पाहिजे.

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

पावसाळ्यात बरेच लोक पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात. परंतु हे करणे टाळले पाहिजे. या ऋतूतही आपल्याला जास्त घाम येतो. म्हणून, आपण पुरेसे पाणी प्यायला हवे. हे आपल्या त्वचेला आतून हायड्रेट ठेवते, ज्यामुळे त्वचा चमकदार राहते.

निरोगी आहार घ्या

निरोगी आहार केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर चांगल्या त्वचेसाठी देखील महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी फळांचा समावेश करू शकता.

हेही वाचा : Monsoon Fashion Tips : पावसाळ्यासाठी स्पेशल पेस्टल साड्यांचा ट्रेंड


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.