Monsoon Update Meteorological Department Monsoon will arrive in Kerala on this day


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरासह राज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अशामध्ये हवामान खात्याने मान्सून भारतात कधी दाखल होणार? याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्ये धडकलेल्या मान्सूनने पुढच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यानंतर पुढे श्रीलंका व्यापल्यानंतर आता हे मोसमी वारे अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराचा काही भागसुद्धा व्यापताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 27 मे आधीच म्हणजे अंदाजे 25 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update Meteorological Department Monsoon will arrive in Kerala on this day)

हेही वाचा : Unseasonal Rain : मुंबईसह नाशिक, पुण्यात धो-धो पाऊस; रत्नागिरीत दरड कोसळून कोकण रेल्वे ठप्प 

प्रत्येक वर्षी शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. पेरणीसाठी शेती तयार करुन ठेवली जाते. दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतो. पण, या वर्षी मान्सून राज्यात लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 25 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि महाराष्ट्रात मान्सून 6 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिला हा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 4 ते 5 दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. पुढच्या 3 दिवसांमध्ये ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये गडगडाटी वादळे, विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 ते 26 मे दरम्यान पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कर्नाटक, कोकण, गोवा, केरळ आणि द्वीपकल्पीय भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हिमाचल प्रदेशात 23 आणि 24 मे रोजी तसेच उत्तराखंडमध्ये 21 ते 26 मे दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट तसेच जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. 20 ते 26 मे दरम्यान पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट तसेच जोरदार वारे पडण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 मे रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Source link

Comments are closed.