स्टोक्सचं ते वर्तन म्हणजे असभ्यपणाचं!

मँचेस्टर कसोटी बळजबरीने ड्रॉ करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने हिंदुस्थानच्या रवींद्र जाडेजाशी जे वर्तन केले ते नक्कीच असभ्यपणाचे होते. मैदानावरील अशा गैरवर्तनामुळेच लोकं इंग्लंडकडे द्वेषाने बघतात, असा घरचा आहेर इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मॉण्टी पानेसरने दिला. ही घटना चौथ्या कसोटीच्या शेवटच्या सत्रात घडली, जेव्हा स्टोक्सने रवींद्र जाडेजाशी हस्तांदोलन करून सामना ड्रॉ घोषित करण्याची विनंती केली, मात्र जाडेजाने सामना संपविण्यास नकार देत आपले पाचवे कसोटी शतक झळकावले.त्याच्याबरोबर असलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेदेखील आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. दोघांनी मिळून नाबाद 203 धावांची भागीदारी रचली. या कसोटीतील स्टोक्सच्या गैरवर्तनावर प्रतिक्रिया देताना मॉण्टी पानेसर म्हणाला, ‘स्टोक्सने जाडेजाशी केलेले वर्तन अत्यंत असभ्य आणि नीच होते. इंग्लंडमध्ये आपण थोडे गर्विष्ठ होतो. त्यामुळे क्रिकेटविश्वात आपली प्रतिमा मलिन होते. स्टोक्ससारखे खेळाडू क्रिकेटचे चांगले राजदूत असू शकतात, पण हे वर्तन अत्यंत निंदनीय होते.’मलिन होते.
Comments are closed.