गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत 14 हजार पोलीस कर्मचारी तैनात, जागोजागी कडक बंदोबस्त
संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. त्या पार्श्वभुमीवर मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईत 14 हजारहून अधिक पोलीस तैनात असून जागोजागी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 36 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त
2637, पोलीस अधिकारी 14 हजार 430 पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरपीएफ प्लाटून, एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी, रायट कंट्रोल युनिट, डेल्टा, कॉम्बॅट व होमगार्ड पथके व इतर महत्वाच्या ठिकाणी अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना मदत करावी, अनोळखी वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे व आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक 100, 112 आणि 103 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दि. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ रोजी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडून मुंबई शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यामध्ये
3⃣6⃣ पोलीस उपायुक्त5️⃣1️⃣ सहाय्यक पोलीस आयुक्त
2️⃣6️⃣3️⃣7️⃣ पोलीस अधिकारी
1️⃣4️⃣4️⃣3️⃣0️⃣ पोलीस…
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) 27 ऑगस्ट, 2025
Comments are closed.