उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हाहाःकार, हजारो हेक्टरवरील पिकं झाली आडवी

वादळ आणि अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील हजारो हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे 33 हजारहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
5 मे ते 13 मे दरम्यान उत्तर महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील 16 हजार 985 हेक्टरवली पीकं आडवी झाली आहे. दीड हजार गावातील 33 हजार 400 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात 9 हजार 806 हेक्टरवर सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यात केळी, कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश आहे.
6 हजार 100 हेक्टरवरील केळी, 950 हेक्टरवरील मका आणि 400 हेक्टरवरील पपईचे या पावसात नुकसान झाले आहे. जळकवानंतर सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून एकूण 4 हजार 803 हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत. नाशकात दोन हजार हेक्टरवरील कांदा, 400 हेक्टरवरील आंब्यांचे नुकसान झाले आहे. नाशिकमधील 775 जिल्ह्यातील 17 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर धुळे जिल्ह्यात 2 हजार 3
48 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अवकाळीग्रस्त गावांना भेटी दिल्या आणि नुकसानीचा आढावा घेतला. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारडे पंचनामा करून मदतीची मागणी केली आहे.
Comments are closed.