Health Tips: दात घासण्यापूर्वी पाणी का प्यावे? जाणून घ्या संपूर्ण फायदे
आपण सकाळी उठल्यावर काय करतो? काही जण थेट चहा घेतात, तर काही व्यायाम करतात. पण आरोग्यदृष्ट्या एक अत्यंत साधी आणि प्रभावी सवय म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी पिणे तेही दात घासण्याआधी. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेतून जागे झाल्यानंतर शरीर 6 ते 8 तास काहीच घेत नसल्यामुळे डिहायड्रेशन होतो. अशा वेळी एक लिटर कोमट पाणी प्यायल्याने शरीर पुन्हा कार्यक्षम होतं आणि अनेक फायदे मिळतात.(morning water drinking benefits)
सकाळी पाणी पिण्याचे फायदे:
1) पचनक्रिया सुधारते:
सकाळी पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रीय होते. त्यामुळे पोटफुगी, गॅसेस, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास टाळता येतात.
2) शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात:
रात्री झोपेत असताना शरीरात साचलेले टॉक्सिन्स पाण्याच्या मदतीने बाहेर टाकले जातात. त्यामुळे आतून शरीर शुद्ध राहतं.
3) त्वचा होते तेजस्वी:
पाणी प्यायल्याने त्वचेतील आर्द्रता टिकते, मुरुमं कमी होतात आणि त्वचा अधिक ताजी आणि उजळ वाटते.
4) उर्जेची पातळी वाढते:
रोज सकाळी पाणी प्यायल्याने थकवा दूर होतो, मेंदू जागृत होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
5) वजन नियंत्रणात मदत:
सकाळी पाणी प्यायल्यामुळे भूक आटोक्यात राहते. यामुळे वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवता येते.
किती पाणी प्यावं?
तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर हळूहळू एक लिटर कोमट पाणी प्यावं. मात्र, हृदयविकार, किडनीचे आजार किंवा यकृतविकार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पाणी पिण्याची योग्य वेळ:
•झोपेतून उठल्यावर, काहीही खाण्यापूर्वी
•दात घासण्याआधी (तोंडातील लाळ आत जावी यासाठी)
•हळूहळू पाणी प्यावं, एकदम संपूर्ण लिटर नाही
पाण्याचे प्रमाण व्यक्तिनिहाय बदलू शकते. कोणतीही आरोग्यविषयक सवय अंगीकारण्यापूर्वी आपल्या शरीराची गरज समजून घेणे आवश्यक आहे.
Comments are closed.