बहुतेक हवे असलेले सलीम पिस्तूल अटक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशाचा एक मोस्ट वाँटेड गुन्हेगार पकडला गेला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने शेख सलीम उर्फ सलीम पिस्टलला नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले आहे. सलीमच्या नावासोबत पिस्टल हा शब्द विशेष कारणामुळे जोडला गेला आहे. सलीम हा अवैध शस्त्रास्त्रांचा मोठा पुरवठादार आहे. सलीम हा 2018 पासून पाकिस्तानातून शस्त्रास्त्रs आणि जिगाना पिस्टलची तस्करी करत होता. आयएसआयसोबत त्याचे कनेक्शन असल्याने पोलिसांना त्याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
सलीम 2018 पासूनच फरार होता, भारतात गँगस्टर्सना जिगाना पिस्टल पुरविणारा तो पहिला गुन्हेगार होता. अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात तो सामील होता. पोलीस अधिकारी सलीम पिस्टलची चौकशी करत आहेत. सलीम पिस्टल कशाप्रकारे डी-कंपनीच्या गुन्ह्यांना हातभार लावत होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक खळबळजनक हत्याप्रकरणांमध्ये सलीमचा हात होता असे यापूर्वीच समोर आले आहे. सलीम पिस्टल हा दिल्लीच्या सलीमपूरचा रहिवासी आहे.
Comments are closed.