विहिरीत उडी मारून मायलेकांनी जीवन संपवले
वृद्ध आई आणि मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रोहा तालुक्यातील सुतारकाडी येथील खिलारे फार्म हाऊसमध्ये आज सकाळी घडली.
मूळ पुणे जिह्यातील असलेले मनीषा काशीकर (80) आणि मंदार काशीकर (43) खिलारे फार्म हाऊसमध्ये काम करीत होते. या दोघांचे मृतदेह आज सकाळी फार्म हाऊसमधील किहिरीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाक घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी महेश सानप यांच्या सह्याद्री कन्यजीक रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू पथकाची मदत घेण्यात आली. मायलेक दोघेही आजारपणामुळे त्रस्त होते. सततच्या आजारपणाला कंटाळून नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.