आईने केली मुलाची हत्या वांद्रे पूर्व येथील घटना

सिझोपहनिया आजाराने त्रस्त असलेल्या महिलेने तिच्या पोटच्या मुलाची घरात वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे पूर्वच्या खेरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एका महिलेला अटक केली. अटक महिला ही मंत्रालयात अधिकारी असलेल्या अधिकाऱयाची पत्नी आहे. तिला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. या घटनेने खेरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मृत मुलगा हा त्याच्या आई आणि वडिलांसोबत वांद्रे खेरवाडी परिसरात राहत होता. मुलाच्या आईला सिझोपहनिया आजाराची लागण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू होते. ती कधी क्षुल्लक कारणावरून आक्रमक व्हायची तर कधी अति प्रेमळपणे वागायची. त्या आक्रमक झाल्यावर कोणाचेही ऐकत नसायच्या आणि प्रेमाने वागू लागल्यावर एखाद्यावर जीव लावत असायच्या. तिच्या विचित्र वागणुकीमुळे सुरुवातीला त्यांना काहीच कळत नव्हते. गुरुवारी सायंकाळी त्या मुलासोबत घरी होत्या.

रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांनी अचानक रूमचा दरवाजा ओढून घेतला. त्यानंतर बेडरूममध्ये असलेल्या त्यांच्या लहान मुलाची वायरने गळा आवळून हत्या केली.

Comments are closed.